img 1
ऑनलाईन फसवणूक व धोखाधडीपासून कसे वाचावे
 
योगेश सपकाळे
 
img 1
 
कोरोना महामारीमुळे लादल्या गेलेल्या बंदीच्या काळात अधिकाधिक लोक व्यवहारांसाठी, विशेषतः आर्थिक देवाण-घेवाणीसाठी, इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहे. मात्र याचा मोठा (गैर) फायदा सायबर गुन्हेगार घेताना दिसत आहेत. दररोज ऑनलाईन फसवणूक व धोखाधडीची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत.
 
img 1 सुरक्षित व सुरळीत आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींबद्दल "मनिलाईफ"चे सहसंपादक योगेश सपकाळे सविस्तर मार्गदर्शन करतील. त्यासोबतच, अशा प्रकरणात बळी पडलेल्यांनी न्याय कसा मिळवावा याबद्दलही ते माहिती देतील.
 
ते खालील मुद्द्यांवर मार्गदर्शन करतील.
  • ऑनलाईन व्यवहाराच्या मूलभूत बाबी व सुरक्षितता
  • ऑनलाईन धोखाधडी आणि त्यापासून कसे वाचावे
  • केवायसीच्या नावाखाली होणारी फसवणूक
  • "जामतारा" तुन होणारी ठकबाजी
  • ओटीपीचे विशेष महत्व
  • संकेतशब्द/ परवलीचा शब्द व त्याची सुरक्षा
  • न्याय कसा मिळवायचा
 
शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२०
 
वेळ: सायं ५. ३० ते ७ वाजेपर्यंत
 
Invitation Link: https://zoom.us/j/94376449053?pwd=aWtuMlVMN0Uxb2lYY2RyZ1h0dTF5dz09
 
Meeting ID: 943 7644 9053
 
Password: [email protected]
 
 
 
योगेश सपकाळे हे ज्येष्ठ पत्रकार असून सध्या मनिलाईफमध्ये सहसंपादक म्हणून कार्यरत आहेत. बँकिंग, अर्थकारण, नियामक, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच ग्राहक व बचतकर्त्यांना भेडसावणाऱ्या अनेक विषयांवर ते लिहितात. आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल सुरक्षा याविषयांवर त्यांचा चांगला अभ्यास असून, ते मनिलाईफ मासिकात तंत्रज्ञानविषयक सदरदेखील लिहितात. इथे येण्यापूर्वी त्यांनी दूरदर्शन, डीडी न्यूज आणि थॉमसन रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेमध्ये काम केले आहे. मनिलाईफ फाउंडेशनतर्फे चालविल्या जाणारया क्रेडिट आणि कायदेविषयक मोफत हेल्पलाईनचे कामही ते पाहतात.
 
 
 
अधिक माहितीसाठी: +91-7045156415 या क्रमांकावर फोन, SMS किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवा. आपण [email protected] या पत्त्यावर इमेलदेखील पाठवू शकता.
(कृपया आपले नाव, इमेल पत्ता आणि संपर्क क्रमांक अवश्य द्यावा)
 
img 1